Thur, June 8, 2023

राज्यात ‘एच३एन२’चे २२ नवे रुग्ण
राज्यात ‘एच३एन२’चे २२ नवे रुग्ण
Published on : 20 March 2023, 4:27 am
मुंबई, ता. २० : राज्यात ‘एच३एन२’ आजाराच्या नव्या रुग्णांमध्ये वाढ होत असून सोमवारी (ता. २०) २२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे ‘एच३एन२’ची एकूण रुग्णसंख्या २१७ झाली आहे. तसेच आज बरे झालेल्या ४१ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.
राज्यात दिवसेंदिवस ‘एच३एन२’ आणि ‘एच१एन१’ रुग्णसंख्येत वाढ होत आहे. राज्यात एक जानेवारीपासून आतापर्यंत इन्फल्युएन्झाचे तीन लाख ५ हजार २४३ संशयित रुग्ण सापडले असून त्यातील ‘एच१एन१’चे ४०७, तर ‘एच३एन२’चे २१७ रुग्ण आढळून आले. तसेच बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. सध्या राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये १५५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, आतापर्यंत राज्यातील एका रुग्णाचा ‘एच१एन१’ने मृत्यू झाला आहे.