मुंबईत एक लाख घरांवर उभारणार हिंदुत्वाची गुढी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत एक लाख घरांवर
उभारणार हिंदुत्वाची गुढी
मुंबईत एक लाख घरांवर उभारणार हिंदुत्वाची गुढी

मुंबईत एक लाख घरांवर उभारणार हिंदुत्वाची गुढी

sakal_logo
By

मुंबई, ता. २१ ः साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला गुढीपाडवा मुंबई भाजपच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. मुंबईत भाजप कार्यकर्त्यांकडून एक लाख गुढ्या उभारीन हिंदू नववर्षाचे स्वागत केले जाणार असल्याची माहिती मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी दिली.
गुढीपाडव्याच्या निमित्ताने मुंबईत होणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी शेलार यांनी प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर हिंदू सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जात आहेत. भाजपतर्फे दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्र,‍ दिवाळी, शिवजयंती आदी सण जल्लोषात साजरे करण्यात आले. नुकतेच ‘जाणता राजा’ महानाट्याला मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. सुमारे एक लाख रसिकांनी हे महानाट्य पाहिले. त्यानंतर आता हिंदू नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील विविध भागांत भाजप नेते, बूथप्रमुख, कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने शोभायात्रा काढण्यात येणार आहे. भाजपचे मुंबईत ९८०० बूथ असून प्रत्येक बूथवरील ११ कार्यकर्ते आपल्या घरी गुढी उभारणार आहे.