वस्त्रोद्योग आयुक्तालय हलविण्याचा निर्णय नाही : फडणवीस

वस्त्रोद्योग आयुक्तालय हलविण्याचा निर्णय नाही : फडणवीस

मुंबई, ता. २१ : मुंबईतील वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे कार्यालय नवी दिल्लीत हलवण्याचा कुठलाही निर्णय केंद्र सरकारने घेतलेला नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले. विधानसभेत उपस्थित झालेल्या या मुद्द्यावर निवेदन करताना फडणवीस म्हणाले, की वस्त्रोद्योग आयुक्त आणि पाच अधिकाऱ्यांना दिल्लीला येण्यास सांगितले आहे. वस्त्रोद्योग मंत्रालयाची फेरबांधणी आणि या क्षेत्राला अधिक चालना देण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. या आयुक्तालयात ५०० अधिकारी-कर्मचारी आहेत. त्यामुळे संपूर्ण आयुक्तालय दिल्लीत हलवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असे म्हणणे चुकीचे आहे. मुंबईतील वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालय दिल्लीला हलवण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही, अशी माहितीही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com