नरेपार्क मैदानात निकृष्ट दर्जाची माती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नरेपार्क मैदानात निकृष्ट दर्जाची माती
नरेपार्क मैदानात निकृष्ट दर्जाची माती

नरेपार्क मैदानात निकृष्ट दर्जाची माती

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : परळ येथील नरेपार्क मैदानात सुशोभीकरणाच्या नावाखाली निकृष्ट दर्जाची माती टाकण्यात आली आहे. या मातीमध्ये दगड, सिमेंटचे तुकडे आणि अन्य विविध वस्तू असल्याने त्याने खेळाडूंना इजा होण्याचा धोका निर्माण झाला आहे. यासंदर्भात संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी मनसेने सहायक आयुक्तांकडे केली आहे.

नरेपार्क मैदानामध्ये मागील काही महिन्यांतच महापालिकेच्या माध्यमातून सुशोभीकरण करण्यात आले आहे. संपूर्ण मैदानात अतिशय निकृष्ट दर्जाची माती टाकण्यात आल्यामुळे मैदानात जागोजागी मोठमोठे दगड बाहेर आलेले आहेत, त्यामुळे खेळाडूंना इजा होत आहेत. सुशोभीकरण झाल्यावर मैदानातील कूपनलिका बंद झालेली आहे. अशा निकृष्ट दर्जाच्या कामाचा सर्व खेळाडूंच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निषेध व्यक्त केला. या प्रकरणाची त्वरित दखल घेऊन संबंधित अधिकारी आणि त्यांनी नेमलेले कंत्राटदार यांच्यावर कठोर कारवाई करून मैदान लवकरात लवकर सुस्थितीत करावे, अशी मागणी मनसेचे शाखा अध्यक्ष नीलेश इंदप यांनी एफ दक्षिण वॉर्डचे सहायक आयुक्तांकडे केली आहे; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.