टाटा पॉवर सोलापुरात सौरउर्जा प्रकल्प उभारणार

टाटा पॉवर सोलापुरात सौरउर्जा प्रकल्प उभारणार

मुंबई, ता. २२ : स्वच्छ ऊर्जानिर्मिती करणारी टाटा पॉवरची एक उपकंपनी टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लि.ला महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि. (एमएसईडीसीएल) कडून सोलापूर येथे २०० मेगावॉट सौरऊर्जा प्रकल्प (पीव्ही) उभारण्यासाठी लेटर ऑफ अवॉर्ड मिळाले आहे. करार अंमलबजावणी तारखेपासून १८ महिन्यांच्या आत हा प्रकल्प कार्यान्वित केला जाईल. या प्रकल्पामुळे वर्षाला अंदाजे ४३ कोटी किलो कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन कमी होईल, अशी माहिती टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष खन्ना यांनी दिली. सध्या कंपनीकडे देशात या ६.५ गिगावॉटपेक्षा जास्त ऊर्जानिर्मितीची क्षमता आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील पुनर्निर्मितीक्षम स्वच्छ ऊर्जानिर्मितीचे लक्ष्य पूर्ण करण्यास साह्य होईल. तसेच पुढील अनेक वर्षांसाठी राज्यात स्वच्छ आणि विश्वासार्ह वीज उपलब्ध करून देणारी मुख्य कंपनी म्हणून आमचे स्थान मजबूत होईल, असेही ते म्हणाले. या प्रकल्पामुळे आता टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जीची एकूण वीजनिर्मिती क्षमता ६,५०३ मेगावॉट पर्यंत पोहोचली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com