अकरावीच्या नोंदणीला लवकरच सुरुवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अकरावीच्या नोंदणीला लवकरच सुरुवात
अकरावीच्या नोंदणीला लवकरच सुरुवात

अकरावीच्या नोंदणीला लवकरच सुरुवात

sakal_logo
By

मुंबई, ता. २२ : दहावीची परीक्षा अंतिम टप्प्यात पोहोचत असल्याने पुढील वर्षाच्या अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी लागणाऱ्या प्रवेश प्रक्रियेची शिक्षण संचालनालयाकडून तयारी सुरू केली जाणार आहे. त्यामुळे महिनाभरात पहिल्या टप्प्याच्या नोंदणीला सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले.
ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यासाठी सध्या वरिष्ठ अधिकारी स्तरावर चर्चा सुरू झाल्या असल्याने यासाठी अनेक खासगी संस्थांनी आपल्याला ही प्रवेश प्रक्रिया राबवण्यासाठी कंत्राट मिळावे यासाठी प्रयत्न सुरू केले असल्याचे कळते. त्यामुळे अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी दहावीची परीक्षा झाल्यानंतर काही दिवसांत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मंत्रालयातील उच्चस्तरीय अधिकारी सूत्रांकडून देण्यात आली.
मागील वर्षी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक अमरावती या पाच महापालिका क्षेत्रांत अकरावीची ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली होती. यंदा त्यात काही नवीन महापालिकांचा समावेश करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे; मात्र काही स्थानिक पदवीधर आणि शिक्षक आमदार यांच्या दबावामुळे हा विषय रखडला असला, तरी येत्या काळात त्यावर निर्णय घेतला जाणार असून राज्यभरात अकरावीचे सर्व प्रवेश ऑनलाईन करण्याची तयारी विभागातील काही अधिकाऱ्यांनी दाखवली असल्याचे सांगण्यात आले.