अनिल परब यांना २८ मार्चपर्यंत दिलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनिल परब यांना २८ मार्चपर्यंत दिलासा
अनिल परब यांना २८ मार्चपर्यंत दिलासा

अनिल परब यांना २८ मार्चपर्यंत दिलासा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २३ : दापोलीतील साई रिसॉर्ट गैरव्यवहार प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने आज शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) नेते अनिल परब यांना २८ मार्चपर्यंत संरक्षण दिले आहे. परब यांच्यावर अटकेसह कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे आदेश न्यायालयाने ईडीला दिले आहेत. न्यायालयाने परब यांना आजपर्यंत दिलासा दिला होता; मात्र आज नियमित खंडपीठ उपलब्ध नसल्यामुळे हा अवधी वाढवण्यात आला. परब यांच्या वतीने आणखी काही दिवस संरक्षण अवधी देण्याची मागणी करण्यात आली. या प्रकरणात ईडीने दोघांना अटक केली आहे. या पाश्वभूमीवर ईडीच्या कारवाईपासून संरक्षण मिळण्यासाठी आणि ईडीचा ईसीआयआर अहवाल रद्दबातल करण्यासाठी परब यांनी याचिका केली आहे.