पेटंट, ट्रेडमार्क कार्यालयाचा प्रश्न विधान परिषदेत

पेटंट, ट्रेडमार्क कार्यालयाचा प्रश्न विधान परिषदेत

संजीव भागवत ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : मुंबईतील पेटंट, ट्रेडमार्कचे कार्यालय गुजरातला हलवण्याचा मुद्दा आज विधान परिषदेत विरोध पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला. सरकारकडून मुंबईचे महत्त्व जाणीवपूर्वक कमी करायचे प्रयत्न सुरू आहेत काय, असा सवाल करत त्यांनी सरकारला धारेवर धरले. तसेच वस्त्रोद्योग आयुक्तालयासंदर्भातही मुद्दा २८९ अन्वये उपस्थित केला. त्यावर सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सरकारने या विषयावर उद्यापर्यंत आपले निवेदन करावे, असे निर्देश दिले.
मुंबईतील पेटंट आणि ट्रेडमार्क कार्यालय हे गुजरातला हलवण्याची तयारी सुरू असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने २० मार्चच्या अंकात ‘मुंबईचे पेटंट कार्यालयही गुजरातच्या वाटेवर?’ या मथळ्याखाली प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत याविषयी चर्चा घडवून आणण्यासाठी २८९ अन्वये प्रस्ताव मांडला होता. मात्र तो प्रस्ताव चर्चेसाठी संमत होऊ शकला नाही; मात्र तो प्रस्ताव मांडताना सरकारच्या एकूण भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सरकारकडून मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न चालू आहे का, असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. जाणीवपूर्वक येथील महत्त्वाची कार्यालये येथून स्थलांतर करून मुंबईच महत्त्व कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न चालू आहे का, याबाबत सरकारकडून योग्य तो खुलासा करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात लावून धरली. सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विरोधी पक्षनेत्यांच्या २८९ प्रस्ताव आणि त्यातील विषय मुंबईसाठी महत्त्वाचा असल्याने सरकारने यासाठी निवेदन करावे, असे निर्देश दिले.
...
प्रसाद लाड यांना खडे बोल सुनावले
विरोध पक्षनेते पेटंट कार्यालय आणि वस्त्रोद्योग आयुक्तालय हे मुंबईतून हलवले जात असून त्यातून मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय का, असा सवाल करत त्यासाठी सरकारने आपले उत्तर द्यावे, अशी मागणी केली जात असताना भाजपचे सदस्य प्रसाद लाड यांनी बसून खोचकपणे बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावर विरोधी पक्षनेत्यांनी लाड यांना सभागृहातच खडे बोल सुनावले. आपण उत्तर देणार आहात का, असा सवाल करत लाड यांची बोलती बंद केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com