क्षयरुग्णांसाठी आंतररुग्ण कक्ष सुविधा

क्षयरुग्णांसाठी आंतररुग्ण कक्ष सुविधा

क्षयरुग्णांसाठी आंतररुग्ण कक्ष
विविध रुग्णालयांत पालिकेची सुविधा
सकाळ  वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : २०२५ पर्यंत क्षयरोग पूर्णपणे रोखण्यासाठी पालिकेने काही उपाययोजना राबवल्या आहेत. त्याअंतर्गत गोवंडीतील शताब्दी रुग्णालय आणि बोरिवलीतील कस्तुरबा क्रॉस रोड रुग्णालयात प्रत्येकी पाच खाटा प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. बालरोग ड्रग रेझिस्टंट रुग्णांसाठी वाडिया रुग्णालयात विशेष बालरोग डीआरटीबी उपचार केंद्रे इनडोअर आणि आऊटडोअर अशा दोन्ही सुविधांसह सुरू करण्यात आले आहे. जे. जे. आणि जीटीबी रग्णालयामध्येही अशी सुविधा उपलब्ध आहे.
भायखळा फार्मसीमार्फत उपलब्ध असलेल्या बालरोग डीआरटीबी उपचार औषधांची पल्व्हरायझेशन (कुटून पावडर बनवणे) सुविधा एनईटीपी  कार्यक्रमाद्वारे क्षयरुग्णांना मोफत उपलब्ध आहे. त्यासह टीबी प्रतिबंधक थेरपी कार्यक्रम मुंबईतील सर्व जिल्ह्यांमध्ये सुरू झाले आहेत. कस्तुरबा रुग्णालयामधील कंटेनरमध्ये कल्चर आणि डीएसटी लॅब जून २०२३ पर्यंत कार्यान्वित होईल. क्षयरोग समूह रुग्णालयातील अद्ययावत कल्चर आणि डीएसटी लॅब एप्रिल २०२३ पर्यंत कार्यान्वित होईल.
२४ मार्च रोजी असलेल्या जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जनजागृतीसाठी पालिकेने अनेक उपक्रम हाती घेतली आहेत. त्यात पथनाट्य, जनजागृती रॅली, टीबी रुग्णांचा क्रिकेट सामना, सायक्लोथॉन, डीटीओएस द्वारे स्थानिक प्रतिनिधित्वाचे संवेदीकरण, रुग्णांचा  मेळावा, सामुदायिक बैठका,  टीबी संदेशांसह होर्डिंग, रेल्वेस्थानकांवर व्हिडीओ, लोकलमध्ये रेडिओ जिंगल्स, बसथांब्यावर होर्डिंग, सीएसटी रेल्वेस्थानक आणि पालिका मुख्यालयावर लाल रंगाची प्रकाशयोजना, मॅरेथॉन आणि एमएसआरटीसी बस डेपोमध्ये जिंगल्स वाजवल्या जाणार आहेत. सर्व २४ जिल्ह्यांमध्ये सेल्फी पॉइंट्स, सर्व प्रभागांमध्ये बॅनर, पॅम्प्लेट्स आणि पोस्टर्ससह आयईसीचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com