घरांचे मुद्रांकशुल्क कमी करावे ः इराणी

घरांचे मुद्रांकशुल्क कमी करावे ः इराणी

मुंबई, ता. २३ ः घरखरेदी करारांचे रजिस्ट्रेशन आता डिजिटल माध्यमातून सोपे झाले आहे. त्यामुळे त्यावरील मुद्रांक शुल्क तीन टक्क्यांपर्यंत कमी केल्यास त्याने घर खरेदीला चालना मिळेल, अशी मागणी किस्टोन रिॲल्टर उर्फ रुस्तमजी ग्रुपचे सीएमडी बोमन इराणी यांनी आज (ता.२३) येथे केली.

वांद्रे पूर्व येथील त्यांच्या रुस्तमजी सीजन्स या प्रकल्पाला भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर पत्रकारांचा पाहणी दौरा आयोजित केला होता, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. याच प्रकल्पाच्या समोरील ओरियाना पुनर्विकास प्रकल्पही आम्ही यशस्वीरित्या पूर्ण केला. दोन्ही ठिकाणी महारेराच्या मुदतीपूर्वीच प्रकल्प पूर्ण करण्यात आले असून येथे वेगवेगळी खेळांची मैदाने, तरणतलाव, जिम, वाचनालय, ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळा विभाग, बेसमेंट, कार पार्किंग आदी आलिशान निवासी संकुलातील सर्व सुविधा आहेत. पुनर्विकासातील परवानगी, मान्यता आदींच्या सरकारी अटी किचकट आहेत. मात्र त्या पाळणे आवश्यकच आहे. त्या जितक्या व्यवस्थित पाळल्या जातील तितके काम लवकर होईल, अशी कबुलीही त्यांनी दिली.
---
सीआरझेड बदलही हवेत
समुद्रकिनाऱ्यावरील रस्त्याच्या जमिनीकडील बाजूचे काही सीआरझेड निकषही शिथिल करणे आवश्यक आहे. मात्र, मुंबईला निसर्गरम्य समुद्रकिनारा हा हवाच असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com