समाजवादी पक्षाविरुद्ध लोढा आक्रमक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

समाजवादी पक्षाविरुद्ध लोढा आक्रमक
समाजवादी पक्षाविरुद्ध लोढा आक्रमक

समाजवादी पक्षाविरुद्ध लोढा आक्रमक

sakal_logo
By

मुंबई, ता. २३ ः समाजवादी पक्षाने पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या विरोधात मोर्चा काढण्याचा इशारा दिल्यामुळे समाजवादी पक्षाविरुद्ध लोढा यांनी आज अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. लोढा यांच्या शासकीय निवासस्थानावर येणाऱ्या समाजवादी पक्षाच्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने लोढा त्यांच्या बंगल्यासमोर जमले होते. त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजीही केली. यावेळी महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार नितेश राणे, आचार्य पवन त्रिपाठी आदी हजर होते. यावेळी या नेत्यांनीही लव्ह जिहादवर जोरदार टीका केली.

लोढा यांनी एक ट्विट करून ‘माहीम तो केवल झाकी है, अभी तो पुरी पिक्चर बाकी है’, असा इशारा दिला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कालच्या जाहीर सभेनंतर आज राज्य सरकारने माहीम येथील धार्मिक स्थळाशेजारची अतिक्रमणे काढून टाकली. यापुर्वी प्रतापगडावरील अफजलखानाच्या कबरी शेजारची अतिक्रमणेही सरकारने काढून टाकली होती. राज ठाकरेंनी सांगलीमधील अशाच अवैध धार्मिक बांधकामाबाबत इशारा दिल्यानंतर तिथेही कारवाईला सुरुवात झाली. त्यामुळे आता लोढा यांचा हा इशारा सूचक आहे का, अशी चर्चा रंगली होती.

महाराष्ट्रात अत्यंत अयोग्य पद्धतीने लव्ह जिहाद सुरू आहे, ते थांबवण्याची गरज आहे. कोणाला लव्ह जिहादबद्दल गर्व असेल, पण आमच्यासाठी ती शरमेची बाब आहे, ते थांबवले पाहिजे. बांगलादेशी आणि रोहिंग्या मतदारांना खुश करायला कोणी लव्ह जिहादचे समर्थन करत असेल तर त्या भाषेला शिवरायांचा महाराष्ट्र जशास तसे उत्तर देईल असे लोढा यांनी आज पत्रकारांना सांगितले.