परदेशात पदव्युत्तर शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

परदेशात पदव्युत्तर शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

मुंबई, ता. २४ ः के. सी. महिंद्र एज्युकेशन ट्रस्टतर्फे भारतीय विद्यार्थ्यांना परदेशात पदव्युत्तर शिक्षणासाठी शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. यानुसार ऑगस्ट २०२३ ते फेब्रुवारी २०२४ पर्यंतच्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळालेल्या किंवा नामांकित परदेशी विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना बिनव्याजी कर्ज शिष्यवृत्ती दिली जाईल. यात पहिल्या तीन विद्यार्थ्यांना प्रत्येकी १० लाख रुपयांपर्यंत, तर उर्वरित यशस्वी अर्जदारांना ५ लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाईल.

अर्जदारांकडे सातत्याने चांगली शैक्षणिक गुणवत्ता आवश्यक आहे. प्राथमिक निवडलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल आणि त्यांची शैक्षणिक कामगिरी, अभ्यासेतर उपक्रम आणि आर्थिक गरज यावर आधारित अंतिम निवड केली जाईल. देशातील अशा गुणवान विद्यार्थ्यांना साह्य केले तर त्यांच्या ज्ञानात वाढ होईलच, पण ते देशाचे भवितव्यही उज्ज्वल करतील. याच हेतूने ही शिष्यवृत्ती दिली जात असल्याचे महिंद्र समूहाच्या सीएसआर विभागाच्या वरिष्ठ उपाध्यक्ष शीतल मेहता म्हणाल्या. १९५६ पासून ट्रस्टतर्फे ही शिष्यवृत्ती दिली जात असून मागील वर्षी ६० विद्यार्थ्यांना तीन कोटी रुपयांहून जास्त साह्य देण्यात आले होते.

अधिक माहितीसाठी https://www.kcmet.org/what-we-do-Scholarship-Grants.aspx#bobcontent0-title
संपर्क: kcmetscholarships@mahindra.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com