जेकेची लेव्हीटास अल्ट्रा टायरची नवी श्रेणी बाजारात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जेकेची लेव्हीटास अल्ट्रा टायरची नवी श्रेणी बाजारात
जेकेची लेव्हीटास अल्ट्रा टायरची नवी श्रेणी बाजारात

जेकेची लेव्हीटास अल्ट्रा टायरची नवी श्रेणी बाजारात

sakal_logo
By

मुंबई, ता. २६ : भारतातील आलिशान लक्झरी गाड्यांसाठी इंग्लंड आणि भारतात भारतातील कठीण वातावरणात कठोर चाचण्या करत जेके टायर अँड इंडस्ट्रीजतर्फे लेव्हिटास अल्ट्रा ही नवी टायरची मालिका बाजारात आणली गेली आहे.

जेके टायर इंडस्ट्रीजचे अध्यक्ष अनुज कथुरिया यांनी या टायरचे अनावरण मुंबईत केले. कोरोनानंतर भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ वेगाने सुरू झाल्यानंतर देशातील लक्झरी कारच्या खपातही पन्नास टक्के वाढ झाली आहे. या वाढीचा फायदा घेण्यासाठी जेकेने टायरची ही नवी श्रेणी बाजारात आणण्यात आली आहे. ही नवी टायर श्रेणी कमी आवाज करणारी, प्रवासात जास्त आराम देणारी, टिकाऊ तसेच भारतातील रस्ते आणि हवामान यांच्यासाठी अनुकूल असल्याचा दावा करण्यात येत आहे. वळणावरही टायरची रस्त्यावरील पकड आणि व्यवस्थित ब्रेकिंग ही या टायरची वैशिष्ट्ये असल्याचेही कथुरिया म्हणाले. भारतातील भौगोलिक आणि रस्त्यांची अवस्था पाहता वेगवान प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी इंग्लंड व भारतातही या टायरच्या कठोर चाचण्या करण्यात आल्या आहेत. कोरड्या व सुक्या रस्त्यांवरही त्यांना पटकन ब्रेक लागतात, चाचणीच्या अनुभवामुळे त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ झाल्याचेही ते म्हणाले. ही टायर सात वेगवेगळ्या आकारांची आहेत. यात लवकरच १९ ते २२ इंची टायरही बाजारात आणली जातील. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या लक्झरी मोटारींसाठी ती वापरता येतील.