किमोथेरपी घेणाऱ्या रुग्णांसाठी टाटा रुग्णालयात विशेष कक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किमोथेरपी घेणाऱ्या रुग्णांसाठी टाटा रुग्णालयात विशेष कक्ष
किमोथेरपी घेणाऱ्या रुग्णांसाठी टाटा रुग्णालयात विशेष कक्ष

किमोथेरपी घेणाऱ्या रुग्णांसाठी टाटा रुग्णालयात विशेष कक्ष

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ :  मुंबईतील टाटा मेमोरियल रुग्णालयात दर दिवशी शेकडो रुग्णांना केमोथेरपी देण्यात येते. त्याचे दुष्परिणाम बळावल्यास रुग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन टाटा रुग्णालयाने ‘केमो केअर युनिट’ सुरू केले आहे. या माध्यमातून मागील आठ महिन्यांमध्ये दोन हजारांहून अधिक रुग्णांना योग्य उपचार व मार्गदर्शन मिळाले आहेत.
कर्करोगाच्या संख्येत भारतात वेगाने वाढ होत आहे. त्यात केमोथेरपीच्या दुष्परिणामांकडे रुग्णांचे दुर्लक्ष होते. त्यामुळे किमोथेरपीनंतर रुग्णांना योग्य मार्गदर्शन व उपचार मिळावेत यासाठी टाटा रुग्णालयाने हा कक्ष सुरू केला आहे. तिन्ही पाळ्यांमध्ये चालणाऱ्या या युनिटमध्ये विशेष प्रशिक्षित १० ‘केमो केअर परिचारिकां’ची नियुक्ती करण्यात आली आहे. या युनिटमधील परिचारिका आणि डॉक्टरांसोबत रुग्ण दूरध्वनीद्वारे संपर्क साधून दुष्परिणाम रोखण्यासाठी मार्गदर्शन मिळवू शकतात. आतापर्यंत या युनिटच्या माध्यमातून दोन हजारांहून अधिक रुग्णांच्या तक्रारी सोडविण्यास मदत करून गंभीर घटना टाळण्यात आल्याची माहिती टाटा रुग्णालयातील मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. विकास ओसवाल यांनी दिली.
...
असे चालते काम...
केमोथेरपी केलेल्या रुग्णांना त्रास झाल्यास ते युनिटच्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करू शकतात. रुग्णांची तक्रार मळमळ, उलट्या अशी सौम्य प्रकारची असल्यास त्यांना जीवनशैली, आहारातील बदल आणि डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे घेण्यास युनिटमधील परिचारिका सांगतात. तक्रार गंभीर असल्यास रुग्णांना जवळच्या क्लिनिकला किंवा टाटा रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागाला भेट देण्यास सांगितले जाते. रुग्णाने दवाखान्याला भेट दिल्यास परिचारिका त्या संबंधित रुग्णालयातील वैद्यकीय सुविधेशी समन्वय साधतात. रुग्णाच्या तक्रारींचे निराकरण झाले असल्याची खात्री करतात. जेणेकरून गंभीर घटना टाळणे शक्य होते. हे सर्व डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली केले जाते.
...
आणखी दोन युनिट सुरू करणार
टाटा रुग्णालयाच्या प्रौढ मेडिकल ऑन्कोलॉजी विभागाकडून ‘केमो केअर युनिट’ सुरू केले आहे. भविष्यात याचा विस्तार करण्यात येणार आहे. सध्या ऑन्कोलॉजी विभागासाठी असलेले हे युनिट लवकरच रक्त कर्करोग, लहान मुलांचा कर्करोग या विभागासाठी सुरू करण्यात येणार आहेत.