पत्नीवरील आरोप प्रसिद्ध करणे मानभंगच

पत्नीवरील आरोप प्रसिद्ध करणे मानभंगच

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २८ : पत्नीवरील आरोप वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करणे हा पत्नीचा मानभंग करण्याचा प्रकार असून क्रूर छळच आहे, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. वर्तमानपत्रात पत्नीच्या विरोधात लिहिणे हेच चुकीचे आहे. त्यांनी लिहिलेले आरोप खरे आहेत की खोटे हा दुय्यम भाग आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

पत्नीने न्यायालयात पतीकडून घटस्फोट मिळण्यासाठी याचिका केली आहे. पती सतत प्रत्येकावर फौजदारी गुन्हा दाखल करत आहे, तिच्या कार्यालयात येऊनदेखील वाद घातला आहे, असे याचिकेत म्हटले आहे. दागिने, स्त्री धनदेखील त्याने गहाण ठेवले आहे, असा आरोप पत्नीने केला आहे. न्यायालयाने पतीच्या एकूणच वर्तनावर नाराजी व्यक्त केली आणि पत्नीची याचिका मंजूर केली. पतीने सतत पत्नीच्या विरोधात, तिच्या घरच्यांविरोधात एवढेच नव्हे, तर तिचे वकील, तपास अधिकारी अशा सर्वांविरोधात तक्रारी केल्या आहेत. हा प्रकार छळ करण्यासारखा आहे, असे न्या. आर. डी. धनुका आणि न्या. एम. एम. साठ्ये यांच्या खंडपीठाने म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com