Fri, June 2, 2023

हसन मुश्रीफांच्या जामिनावरील सुनावणी पूर्ण
हसन मुश्रीफांच्या जामिनावरील सुनावणी पूर्ण
Published on : 28 March 2023, 2:40 am
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : मनी लॉण्डरिंग प्रकरणात माजी कामगारमंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या तीन मुलांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली असून विशेष न्यायालयाने निकाल ५ एप्रिलपर्यंत राखून ठेवला आहे. सध्या मुश्रीफ यांची चौकशी ईडीने सुरू केली आहे. उच्च न्यायालयाने त्यांना तूर्तास अटकेपासून दिलासा दिला आहे. ईडीने मुश्रीफ यांच्या साखर कारखान्यावर छापे सुरू केले आहेत. या कारखान्यात त्यांची तीन मुले आबीद, नावेद आणि साजीद पदाधिकारी आहेत. तिघांनीही सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. तसेच त्यांच्या सीएनेदेखील न्यायालयात अर्ज केला आहे.