शेअरबाजारात ३४६ अंशांची वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेअरबाजारात ३४६ अंशांची वाढ
शेअरबाजारात ३४६ अंशांची वाढ

शेअरबाजारात ३४६ अंशांची वाढ

sakal_logo
By

मुंबई, ता. २९ : दिलासादायक वातावरणात आज जोरदार खरेदी झाल्यामुळे भारतीय शेअर बाजार निर्देशांक पाऊण टक्क्यांच्या आसपास वाढले. सेन्सेक्स ३४६.३७ अंश, तर निफ्टी १२९ अंशांनी वाढला. आज निफ्टी दिवसभरात १७,१०० च्या वर जाऊन आला आणि १७,०८०.७० अंशांवर बंद झाला. सेन्सेक्सही अठ्ठावन्न हजारांच्या जवळच म्हणजे ५७,९६०.०९ वर बंद झाला.

आज वाहन निर्मिती क्षेत्र, एफएमसीजी, सार्वजनिक बँका, कॅपिटल गुड्स, बांधकाम व्यवसाय आणि धातू निर्मिती क्षेत्र एक ते तीन टक्का वाढले होते. निफ्टीमध्ये अदाणी इंटरप्राईजेस, अदाणी पोर्ट, जेडब्ल्यू स्टील, आयशर मोटर या शेअरचे भाव वाढले; तर निफ्टीमध्येच यूपीएल, भारती एअरटेल, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक, एशियन पेंट या शेअरचे भाव कमी झाले.

कोट
.........
शुक्रवारी इंग्लंडच्या जीडीपीचा तपशील येणार असून इंग्लंड आणि अमेरिकेच्या जीडीपी तपशिलानुसार ठरणाऱ्या अमेरिकी फेड बँकेच्या व्याजदरामुळे बाजाराला दिशा मिळेल.
- सिद्धार्थ खेमका, मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्विसेस