राज्यात कोरोनाने तीन रुग्णांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यात कोरोनाने तीन रुग्णांचा मृत्यू
राज्यात कोरोनाने तीन रुग्णांचा मृत्यू

राज्यात कोरोनाने तीन रुग्णांचा मृत्यू

sakal_logo
By

मुंबई, ता. २९ : मुंबईसह राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. राज्यात बुधवारी ४८३ नवीन रुग्णांची नोंद झाली असून तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत १३९ नवीन रुग्ण आढळल्याने मुंबईसह राज्यात सरकारच्या आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पडली आहे.
बाधित रुग्णांची एकूण संख्या ८१ लाख ४२ हजार ९९२ वर पोहोचली आहे; तर तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याचे मृतांची संख्या १ लाख ४८ हजार ४४१ वर पोहोचली आहे. मुंबईत १३९ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने बाधित रुग्णांची संख्या ११ लाख ५६ हजार ७२४ वर पोहोचली आहे. बुधवारी दिवसभरात शून्य मृत्यूची नोंद झाल्याने मृतांची संख्या १९ हजार ७४७ वर स्थिरावली आहे. ७१ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत ११ लाख ३६ हजार २३६ रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. त्यामुळे मुंबईत सध्या ७३१ सक्रिय रुग्ण आहेत. यंत्रणांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.