ओडिसीची ‘व्हॅडर’ ई मोटरसायकल

ओडिसीची ‘व्हॅडर’ ई मोटरसायकल

मुंबई, ता. ३१ ः ओडिसी इलेक्ट्रिक व्हेईकलने ‘व्हॅडर’ ही ताशी ८५ किमीच्या वेगाने धाऊ शकणारी इलेक्ट्रिक मोटारसायकल बाजारात आणली आहे. तिची किंमत सव्वा लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.
कंपनीचे सीईओ नेमीन व्होरा, भाजपचे राज्य उपाध्यक्ष प्रसाद लाड, शिवसेनेचे विधानसभेतील प्रतोद भरत गोगावले यांच्या उपस्थिती या ई-मोटारसायकलचे अनावरण करण्यात आले.
चार तासांत पूर्ण चार्ज होऊ शकणारी ही मोटारसायकल १२५ किलोमीटर अंतर जाऊ शकते. त्यावर सात इंची अँड्रॉईड स्क्रीन व गुगल मॅप असून ओडीसी ईव्ही ॲप किंवा ब्लूटूथद्वारे त्याचे संचलन करता येते. हिची बॅटरी पूर्णपणे सुरक्षित असून चार्जिंग संपत आल्यासही ॲपद्वारे इशारा दिला जातो. मोटारसायकल चोरी होऊ नये यासाठी किंवा हरवलेली मोटारसायकल शोधण्यातदेखील या ॲपचा उपयोग होतो. या वर्षात आम्ही इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणू व देशभरातील विक्रेत्यांची संख्याही दीडशेपेक्षा जास्त नेऊ. त्यामुळे आमची विक्रीही तिप्पट वाढेल, असेही व्होरा म्हणाले. तिच्या बॅटरीसाठी तीन वर्षांची वॉरंटी आहे. ९९९ रुपये भरून बुकिंग केल्यावर जुलैपासून ती ग्राहकांना देण्यात येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com