रोजगार मेळाव्यात ८,३२२ पदांकरीता मुलाखती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रोजगार मेळाव्यात ८,३२२ पदांकरीता मुलाखती
रोजगार मेळाव्यात ८,३२२ पदांकरीता मुलाखती

रोजगार मेळाव्यात ८,३२२ पदांकरीता मुलाखती

sakal_logo
By

मुंबई, ता. १ : मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत दादर पूर्वेतील नायगाव येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी विविध उद्योग, कंपन्या आणि कॉर्पोरेट अशा ३० संस्थांनी त्यांच्याकडील ८ हजार ३२२ पदांसाठी नोकरीइच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. या मेळाव्यात उमेदवारांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्‍घाटन झाले.

नायगावमधील स्प्रिंग मिल कम्पाऊंड येथे झालेल्या या कार्यक्रमास आमदार कालिदास कोळंबकर, मेळाव्याचे समन्वयक प्रदीप दुर्गे, कौशल्य विकास विभागाचे अधिकारी, स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही या मेळाव्याला भेट देऊन पाहणी केली. कौशल्य विकास विभागाने तरुणांना कौशल्य विकासाबरोबरच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी राज्यात रोजगार मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. राज्य सरकारने ७५ हजार सरकारी नोकऱ्या देण्याचा निर्धार केला आहे, त्याचबरोबर कौशल्य विकास विभागाद्वारे विविध कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट क्षेत्र यांच्याशी समन्वय साधून येत्या काळात ५ लाख रोजगार देण्यात येतील, अशी माहिती या वेळी लोढा यांनी दिली.