बुकी जयसिंघानीची याचिका फेटाळली

बुकी जयसिंघानीची याचिका फेटाळली

मुंबई, ता. ३ : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीला धमकावल्याच्या आरोपात अटकेत असलेला बुकी अनिल जयसिंघानीने मुंबई पोलिसांनी केलेल्या अटकेविरोधात केलेली याचिका आज न्यायालयाने फेटाळली.
जयसिंघानी आणि त्याची मुलगी अनिक्षाविरोधात फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी मलबार हिल पोलिस ठाण्यात खंडणी आणि लाच दिल्याचा प्रयत्न केल्याची फौजदारी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी जयसिंघानीला गुजरातमध्ये ताब्यात घेतले आणि चोवीस तास झाल्यावर मुंबईमध्ये न्यायालयात रिमांडसाठी हजर केले; मात्र ही अटक बेकायदा आहे, पोलिसांनी ताबा घेतल्यानंतर चोवीस तासांत न्यायालयात हजर करायला हवे होते, असा दावा जयसिंघानीने केला होता. पोलिसांच्या वतीने महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी याचिकेला विरोध केला. पोलिसांनी नियमांचे पालन करून जयसिंघानीला अटक केली आहे. यामध्ये नियमांचा भंग केलेला नाही, असा खुलासा केला. न्या. अजय गडकरी आणि न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाने दोन्ही पक्षकारांच्या युक्तिवादानंतर जयसिंघानीची याचिका फेटाळली. याचिकेत गुणवत्तेचा अभाव असून आधारहीन आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. जयसिंघानी सध्या मध्य प्रदेश पोलिसांच्या ताब्यात आहे. गोवा पोलिसांनीदेखील त्याचा ताबा मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज केला आहे.
...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com