‘एच३एन२’चे राज्यात चार नवे रुग्ण

‘एच३एन२’चे राज्यात चार नवे रुग्ण

मुंबई, ता. ४ : राज्यामध्ये मंगळवारी ‘एच३एन२’च्या चार नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या ३७९ इतकी झाली आहे. तसेच सध्या विविध रुग्णालयांत ११३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात १ जानेवारीपासून आतापर्यंत इन्फ्ल्युएंझाचे ३ लाख ७० हजार ५४६ संशयित रुग्ण सापडले असून, त्यांना ‘ऑसेलटॅमीवीर’ हे औषध देण्यात आले आहे. यामध्ये ‘एच१एन१’चे ४६९ तर ‘एच३एन२’चे ३७९ रुग्ण आढळले आहेत. सध्या राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये ११३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com