मुंबईत पुन्हा कोरोना वॉर्ड रूम!

मुंबईत पुन्हा कोरोना वॉर्ड रूम!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ५ : राज्यासह मुंबईत कोरोना रुग्णसंख्येचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. मंगळवारी (ता. ४) राज्यात चार रुग्णांचा कोविडने मृत्यू झाला. यामुळे चिंता अधिक वाढली आहे. या रुग्णसंख्येवर आताच नियंत्रण न आणल्यास आणखी एका लाटेचा तडाखा बसण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पालिका प्रशासनाने कोरोना वॉररूम पुन्हा सुरू करण्याची तयारी केली आहे. यातील काही वॉर्डमधील वॉररूम सुरूही झाल्याचे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

गेल्या दोन लाटांच्या दरम्यान पालिकेच्या वॉररूममधून कोविडची लढाई सक्षमपणे लढण्यात आली होती. रुग्णांची तपासणी तसेच वैद्यकीय सुविधा पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका वॉररूमनेच बजावली होती. कोविड रुग्णसंख्या कमी झाल्यावर या वॉररूममधून आरोग्याशी संबंधित समस्यांवर लक्ष ठेवले जात होते. आता मात्र वॉररूम्सना कोविड रुग्णांची माहिती घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्यांनी कोविड लस किंवा बूस्टर डोस चुकवले आहेत, अशांपर्यंत पोहोचण्याचे निर्देश दिले असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com