पु. ल. देशपांडे कला अकादमीत ‘उत्सव महासंस्कृतीचा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पु. ल. देशपांडे कला अकादमीत ‘उत्सव महासंस्कृतीचा’
पु. ल. देशपांडे कला अकादमीत ‘उत्सव महासंस्कृतीचा’

पु. ल. देशपांडे कला अकादमीत ‘उत्सव महासंस्कृतीचा’

sakal_logo
By

पु. ल. देशपांडे कला अकादमीत ‘उत्सव महासंस्कृतीचा’
राज्य सांस्कृतिक पुरस्काराचे आज वितरण

मुंबई, ता. ९ : कलेच्या विविध क्षेत्रात प्रतिवर्षी नाटक, कंठसंगीत, उपशास्त्रीय संगीत, वाद्यसंगीत, मराठी चित्रपट, कीर्तन/समाजप्रबोधन, तमाशा, शाहिरी, नृत्य, लोककला, आदिवासी गिरीजन आणि कलादान या क्षेत्रांमध्ये ज्या कलाकारांनी प्रदीर्घ काळ सेवा केलेली आहे, अशा कलावंताना राज्य सांस्कृतिक पुरस्काराने गौरवले जाते. यंदा सोमवारी (ता. १०) कलांगण, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई येथे या सोहळा पार पडणार आहे. रुपये एक लाख, मानचिन्ह, मानपत्र, शाल असे या राज्य सांस्कृतिक पुरस्काराचे स्‍वरूप आहे.

पुरस्कार वितरणप्रसंगी ‘उत्सव महासंस्कृतीचा’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीधर फडके, सावनी रवींद्र, भजनसम्राट ओमप्रकाश, कार्तिकी गायकवाड, संदेश उमप, संपदा माने, संपदा दाते, शाहीर संतोष साळुंखे, संघपाल तायडे तसेच शिल्पी सैनी आदी कलाकार त्‍यांच्‍या कला सादर करणार आहेत. या वेळी रसिकांना नृत्य, नाट्य, भक्तिसंगीत अशा विविध कलाविष्‍कारांचा आनंद घेता येणार आहे. या कायक्रमाचे संगीत संयोजन कमलेश भडकमकर करणार आहेत. महाराष्ट्राच्या कलारत्नांचा सन्मान करण्यासाठी तसेच यासोबत सादर होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घेण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, शालेय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर आदींच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्‍कार प्रदान केले जाणार आहेत.


यांना मिळणार पुरस्‍कार
नाटक
कुमार सोहोनी (२०२०), गंगाराम गवाणकर (२०२१)
कंठसंगीत
पंडितकुमार सुरशे (२०२०), कल्याणजी गायकवाड (२०२१)
उपशास्त्रीय संगीत
शौनक अभिषेकी (२०२०), देवकी पंडित (२०२१)
मराठी चित्रपट
मधु कांबीकर (२०२०), वसंत इंगळे (२०२१)
कीर्तन
ज्ञानेश्वर वाबळे (२०२०), गुरुबाबा औसेकर (२०२१)
शाहिरी
अवधूत विभूते (२०२०), कृष्णकांत जाधव (मरणोत्तर) (२०२१)
नृत्य
शुभदा वराडकर (२०२०), जयश्री राजगोपालन (२०२१)
कलादान
अन्वर कुरेशी (२०२०), देवेंद्र दोडके (२०२१)
वाद्यसंगीत
सुभाष खरोटे (२०२०), ओंकार गुलवडी (२०२१)
तमाशा
शिवाजी थोरात (२०२०), सुरेश काळे (२०२१)
लोककला
सरला नांदुरेकर (२०२०), कमलबाई शिंदे (२०२१)
आदिवासी गिरीजन
मोहन मेश्राम (२०२०), गणपत मसगे (२०२१)