कला प्रवेशाच्या सीईटीवरून विद्यार्थ्यांमध्ये नाराजी

कला प्रवेशाच्या सीईटीवरून विद्यार्थ्यांमध्ये नाराजी

मुंबई, ता. १२ : राज्यातील विविध कला महाविद्यालयांत उपलब्ध असलेल्या दृष्यकला व अभिकल्प पदवी अभ्यासक्रमाअंतर्गत प्रथम वर्ष प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या एमएएच-एएसी-सीईटी -२०२३ या सामायिक प्रवेश परीक्षेची सुरुवात १५ एप्रिलपासून होत आहे; मात्र या परीक्षेसाठी राज्यातील विद्यार्थ्यांना तयारीसाठी खूप कमी अवधी सीईटी सेलने दिल्याने याविषयी पालक-विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
मागील वर्षी जून महिन्यात ही परीक्षा घेण्यात आली होती. त्यामुळे राज्यातील विद्यार्थी त्या दृष्टीने तयारी करत होते; परंतु सीईटीची नोंदणी पूर्ण होताच केवळ काही दिवसांच्या आत परीक्षा घेतली जात असल्याने राज्यातील शेकडो विद्यार्थी संभ्रमात सापडले आहेत. प्रत्येक वर्षी एमएएच-एएसी-सीईटी ही चित्रकला अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची सीईटी मे महिन्याच्या सुमारास घेतली जाते; मात्र या वेळी विद्यार्थ्यांना वेळच कमी देण्यात आल्याने त्यातून राज्यातील विद्यार्थ्यांना मोठा फटका बसेल आणि ते विविध प्रकारच्या चित्रकला अभ्यासक्रमाला मुकण्याची भीती कला शिक्षक तरुण भाटे यांनी व्यक्त केली आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना वेळ मिळावा यासाठी ही सीईटी पुढे ढकलून ती मे महिन्याच्या सुमारास घ्यावी, अशी मागणी भाटे यांच्यासह विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.
...
प्रवासाचाही प्रश्न
राज्यात २३ मार्चला बारावीची परीक्षा संपली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू केली. आता एमएएच-एएसी-सीईटी -२०२३ ही १५ एप्रिलला सुरू होत आहे. यामध्ये राज्यातील विद्यार्थ्यांना केवळ काही दिवसांचा वेळ मिळाला आहे. त्यामध्ये त्यांनी तयारी कधी करायची, असा सवाल विद्यार्थी करत आहेत. एमएएच-एएसी-सीईटी -२०२३ या परीक्षेसाठी केंद्र मुंबई, पुणे आदी शहरांत असते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इतक्या कमी वेळेत प्रवासासाठीची तयारी कधी करायची, असाही प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com