हसन मुश्रीफ यांना
दोन आठवडे दिलासा

हसन मुश्रीफ यांना दोन आठवडे दिलासा

मुंबई, ता. १३ : मनी लॉण्डरिंग प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांना मुंबई उच्च न्यायालयाने आज दोन आठवडे म्हणजेच २७ एप्रिलपर्यंत दिलासा दिला आहे. तसेच सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) अटकपूर्व जामिनाच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले.
मुंबई विशेष न्यायालयाने नुकतेच मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे त्यांच्या वतीने तातडीने उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. माझ्याविरोधात राजकीय वैमनस्यातून आरोप केले जात आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या माझ्यावर जाणीवपूर्वक आरोप करत आहेत, असा दावा मुश्रीफ यांनी याचिकेत केला आहे. न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्यापुढे आज याचिकेवर सुनावणी झाली. ईडीच्या वतीने प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी अवधी मागण्यात आला. न्यायालयाने हा अवधी मंजूर केला आणि सुनावणी २७ एप्रिलपर्यंत तहकूब केली. ईडीच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी बाजू मांडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com