Tue, October 3, 2023

थॅलेसेमिया रुग्णांसाठी
विशेष रक्तदान शिबीर
थॅलेसेमिया रुग्णांसाठी विशेष रक्तदान शिबीर
Published on : 13 April 2023, 2:44 am
मुंबई, ता. १३ : नायर रुग्णालयात थॅलेसेमिया रुग्णांसाठी नुकतेच विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. जीवनदाता सामाजिक संस्था आणि मैत्र दिंडी फेसबुक परिवाराच्या सहकार्याने आयोजित शिबिरात ६९ जणांनी रक्तदान केले. रक्ताचा तुटवडा निर्माण होत असल्याने थॅलेसेमिया रुग्णांच्या अडचणीत वाढ होत आहे. त्यामुळे जीवनदाता या सामाजिक संस्थेकडून नियमित रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. त्यानुसार यंदा पालिकेच्या नायर रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे जीवनदाता संस्थेचे गणेश आमडोसकर यांनी सांगितले.