नवलखा यांच्यावरील
आरोपात प्रथमदर्शनी तथ्य

नवलखा यांच्यावरील आरोपात प्रथमदर्शनी तथ्य

मुंबई, ता. १३ : भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणात आरोपी असलेले विचारवंत गौतम नवलखा यांच्यावरील माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात प्रथमदर्शनी तथ्य आढळणारे पुरावे दिसतात, असे निरीक्षण विशेष एनआयए न्यायालयाने व्यक्त केले आहे. यामुळे नवलखा यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
नवलखा यांनी नियमित जामिनासाठी केलेला अर्ज विशेष न्यायालयाने नुकताच नामंजूर केला आहे. यासंबंधीचे निकालपत्र बुधवारी उपलब्ध झाले. नवलखा हे बंदी घातलेल्या माओवादी संघटनेचे सदस्य असल्याचे दिसते, असे निरीक्षण विशेष न्या. राजेश कटारिया यांनी व्यक्त केले. अनेक संरक्षक जवानांना या संघटनेने मारले आहे. तपास यंत्रणेने दाखल केलेल्या आरोपपत्रातील कागदपत्रांवरून नवलखा सक्रिय सदस्य होते, असे प्रतित होते. नवलखा हे या गुन्ह्यात आणि कटकारस्थानात सहभागी होते आणि अन्य आरोपींप्रमाणे ते शस्त्रास्त्रे प्रशिक्षणातही सामील होते, असेही
कागदपत्रांवरून स्पष्ट होत असल्याचे म्हटले आहे. तसेच काश्मीर मुक्त संघटनेचा सदस्य सय्यद गुलाम नबी फईबरोबर नवलखा यांचे संबंध असल्याच्या आरोपपत्रात केलेल्या दाव्याचा आढावा न्यायालयाने घेतला आहे. दरम्यान, नवलखा सध्या नवी मुंबईत नजरकैदेत आहेत. उच्च न्यायालयाने त्यांच्या जामीन अर्जावर नव्याने सुनावणी घेण्याचे निर्देश विशेष न्यायालयाला दिले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com