तापलेल्या मुंबईत हवेचा स्तर ‘समाधानकारक’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तापलेल्या मुंबईत हवेचा स्तर ‘समाधानकारक’
तापलेल्या मुंबईत हवेचा स्तर ‘समाधानकारक’

तापलेल्या मुंबईत हवेचा स्तर ‘समाधानकारक’

sakal_logo
By

मुंबई, ता. १७ : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून उन्हाची काहिली वाढली असली तरी सुटलेल्या हवेमुळे हवेचा स्तर सुधारल्याचे दिलासादायक चित्र आहे. मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक ‘समाधानकारक’ नोंदवण्यात आला आहे. आठ नोडमध्ये हवेचा दर्जा ‘समाधानकारक’ असून दोन विभागांत ‘मध्यम’ एक्यूआयची (हवा गुणवत्ता निर्देशांक) नोंद झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने तापमान स्थिर असल्याचे दिसले. मुंबई आणि परिसरात पावसाच्या हलक्या सरी बरसल्याने प्रदूषण कमी झाले आहे. मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक ८० असा समाधानकारक नोंदवण्यात आला आहे. भांडुप (एक्यूआय ६३), कुलाबा (७६), मालाड (७३), बोरिवली (५३), माझगाव (८४), वरळी (५३) आणि अंधेरी (५५) मध्ये हवेचा स्तर ‘समाधानकारक’ आहे. बीकेसीत ११४ आणि चेंबूरमध्ये १३५ एक्यूआयसह हवेचा ‘मध्यम’ स्तर नोंदवण्यात आला आहे.

अवकाळी पाऊस आणि सुटलेल्या वाऱ्यामुळे मुंबईतील कमाल तापमानातही घट झाली आहे. मुंबईतील कमाल तापमान ३२ अंशांपर्यंत खाली आले आहे. सोमवारी कुलाब्यात ३२.२ आणि सांताक्रूझमध्ये ३३.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत तापमानात एक ते दोन अंशांची घट झाली आहे. किमान तापमानात काहीसी वाढ झाली आहे. कुलाबा आणि सांताक्रूझमध्ये अनुक्रमे २५.६ व २५.४ अंशांची नोंद झाली आहे. आर्द्रता ८२ आणि ६७ टक्के इतकी आहे. परिणामी, मुंबईतील उकाडा कायम आहे.

परिसर एक्यूआय स्तर
भांडुप ६३ समाधानकारक
कुलाबा ७६ समाधानकारक
मुलुंड ७३ समाधानकारक
माझगाव ८४ समाधानकारक
वरळी ५३ समाधानकारक
बोरिवली ९७ समाधानकारक
अंधेरी ५५ समाधानकारक
नवी मुंबई ९३ समाधानकारक
बीकेसी ११४ मध्यम
चेंबूर १३५ मध्यम

तापमान
कुलाबा ः ३२.२ अंश सेल्सिअस
सांताक्रूझ ः ३३.८ अंश सेल्सिअस