राज्यात कोरोनामुळे चौघांचा मृत्यू

राज्यात कोरोनामुळे चौघांचा मृत्यू

मुंबई, ता. १९ : मुंबईसह राज्यात कोरोनाचा आलेख चढता असून बुधवारी राज्यात कोरोनामुळे चार रुग्णांचा मृत्यू झाला; तर राज्यात तब्बल १,१०० नव्या रुग्णांची नोंद झाली. मुंबईत आज २३४ नवे रुग्ण आढळले असून राज्यात मृत्यू झालेल्या चौघांपैकी एक मृत्यू मुंबईतील असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. मुंबईसह राज्यात कोरोनाचा झपाट्याने प्रसार होत असून मंगळवारी राज्यात ९४९ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने राज्यात बाधित रुग्णांची संख्या ८१ लाख ५८ हजार ३९३ वर पोहोचली आहे; तर राज्यात दिवसभरात ४ बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या १ लाख ४८ हजार ४८९ वर पोहोचली आहे. दिवसभरात राज्यात १,११२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत राज्यात ८० लाख ३ हजार ८०२ रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. त्यामुळे राज्यात सध्या ६,१०२ सक्रिय रुग्ण आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com