बालिकेला आरोपीचा नाव माहिती असणे अपेक्षित नाही! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बालिकेला आरोपीचा नाव माहिती असणे अपेक्षित नाही!
बालिकेला आरोपीचा नाव माहिती असणे अपेक्षित नाही!

बालिकेला आरोपीचा नाव माहिती असणे अपेक्षित नाही!

sakal_logo
By

मुंबई, ता. २२ : सहा वर्षे वयाच्या बालिकेचे लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपीचे नाव पीडितेला माहिती असणे अपेक्षित नाही, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले असून आरोपीची सक्तमजुरीची शिक्षा कायम ठेवली आहे.
उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. विभा कनकवाडी आणि न्या. वाय. जी. खोब्रागडे यांच्या खंडपीठाने ३७ वर्षीय आरोपीला सुनावलेली पंधरा वर्षांची शिक्षा कायम केली. २०१३ मध्ये घडलेल्या या घटनेच्या वेळी पीडितेने तिच्या आईला याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर आईने तक्रार दाखल केली. पोलिसांनी मुलीची जबानी तीन दिवसांनी नोंदवली होती, ज्यामध्ये तिने आरोपीचे टोपणनाव सांगितले होते. त्यावरून पोलिसांनी त्याला अटक केली. स्थानिक न्यायालयाने आरोपीला दोषी घोषित केले आहे. याविरोधात त्याने उच्च न्यायालयात अपील केले होते. पीडितेने आरोपीचे पूर्ण नाव घेतले नाही, त्यामुळे तिला पढवलेले आहे, असा दावा आरोपीच्या वतीने करण्यात आला; मात्र खंडपीठाने हा दावा अमान्य केला. सहा वर्षे अल्पवयीन पीडितेला आरोपीचे पूर्ण नाव माहीत असणे आवश्यक नाही, तसेच अशा परिस्थितीमध्ये अभियोग पक्ष, पोलिस आणि न्यायालयाने सत्य शोधण्यासाठी पीडितेला सहज समजतील असे प्रश्न विचारायला हवेत, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले आहे.