तामिळनाड मार्कंटाइल बँकेला एक हजार कोटी रुपयांचा नफा

तामिळनाड मार्कंटाइल बँकेला एक हजार कोटी रुपयांचा नफा

मुंबई, ता. २४ : देशातील जुन्या खासगी बँकांपैकी असलेल्या तमिळनाड मार्कंटाइल बँकेला नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात १,०२९ कोटी रुपये निव्वळ नफा झाला असून ही त्यांची आतापर्यंतची सर्वोच्च कामगिरी आहे.

बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कृष्णन यांनी आज येथे पत्रकारांना ही माहिती दिली. या आर्थिक वर्षात बँकेला आतापर्यंत इतिहासातील सर्वोच्च म्हणजे २,०९४ कोटी रुपये एवढे व्याजाचे उत्पन्न मिळाले. बँकेचे एनपीए (अनुत्पादक मालमत्ता) ०.६२ टक्क्यांपर्यंत घसरले असून ही कामगिरी गेल्या दहा वर्षातील सर्वोत्तम आहे, असेही ते म्हणाले. वर्षभरात बँकेच्या ठेवी ४७ हजार ७६७ कोटी एवढ्या झाल्या; तर त्यांनी ३७ हजार ५८२ कोटी रुपयांची कर्जे दिली. त्यांचा निव्वळ नफा गेल्या वर्षीपेक्षा २५ टक्क्यांनी वाढला; तर व्याजाचे उत्पन्नही गेल्या वर्षीपेक्षा १५ टक्क्यांनी वाढले. गेल्या वर्षभरात बँकेने देशभरात २१ नव्या शाखा उघडल्या असून या वर्षांत ५० शाखा उघडल्या जातील. बँकेने विमा उत्पादनांसाठी विविध खासगी विमा कंपन्यांशी सहकार्य केले आहे. बँकेच्या १७ राज्यांमध्ये ५३० शाखा व ५० लाख खातेधारक असल्याचेही कृष्णन यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com