मुंबईसह राज्यात कोरोनाचा दिलासा

मुंबईसह राज्यात कोरोनाचा दिलासा

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : कोरोनाबाधित रुग्णसंख्येत घट झाली असून सोमवारी मुंबईसह राज्यात कोरोनामुळे शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात सोमवारी २२६; तर मुंबईत ५९ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. बाधित रुग्णसंख्या घसरली आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यात कोरोनाचा दिलासा मिळाला आहे.
सोमवारी राज्यात २२६ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने राज्यात बाधित रुग्णांची संख्या ८१ लाख ६२ हजार १२० वर पोहोचली आहे; तर राज्यात सोमवारी शून्य मृत्यूची नोंद झाल्याने मृतांची संख्या १ लाख ४८ हजार ५०४ वर स्थिरावली आहे. दरम्यान, राज्यात दिवसभरात ५०५ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने राज्यात आतापर्यंत ८० लाख ७ हजार ८४० रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. त्यामुळे राज्यात ५,७७६ सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत सोमवारी ५९ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने बाधित रुग्णांची संख्या ११ लाख ६१ हजार ९४६ वर पोहोचली आहे; तर दिवसभरात शून्य मृत्यूची नोंद झाल्याने मुंबईत मृतांची संख्या १९ हजार ७६१ वर स्थिरावली आहे; तर दिवसभरात १३१ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत मुंबईत १२ लाख ४० हजार ९२१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे मुंबईत सध्या १,२६४ सक्रिय रुग्ण आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com