व्यसनांपासून दूर रहा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

व्यसनांपासून दूर रहा
व्यसनांपासून दूर रहा

व्यसनांपासून दूर रहा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : प्रत्येक तरुणाने जीवनात कष्टाला महत्त्‍व दिले पाहिजे, तसेच प्रामाणिकपणे काम केल्यास उद्देश साध्य करता येऊ शकतो. यासाठी व्यसनांपासून दूर राहा, असा सल्‍ला लाचलुचपत प्रतिबंधक खात्‍याचे पोलिस महासंचालक विश्वास नांगरे-पाटील यांनी दिला आहे. नांगरे-पाटील हे महापालिकेचे सायन रुग्णालयाच्या ७६व्या वर्धापनदिन कार्यक्रमात बोलत होते. शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या विश्‍वास नांगरे पाटील यांनी भाषणातून शिक्षकांमुळे आपल्या आयुष्याला योग्य वळण लाभल्याचे सांगितले. शारीरिक फिटनेससाठी दक्ष असणारे नांगरे पाटील यांनी स्वतःचे शिस्तबद्ध राहणीमान विषद केले. प्रतिबंधक औषधशास्त्राचे महत्त्व सांगत आपल्या खुमासदार शैलीत कधी मराठी, तर कधी इंग्लिश भाषेतील कवनांतून संवाद साधला. त्यानंतर या जागतिक शांतिसंदेश देणारे प्रेमकुमार रावत यांचा संदेशपर व्हिडीओ येथे दाखविण्यात आला.
शीव येथील लोकमान्य टिळक महापालिका वैद्यकिय महाविद्यालय व सर्वसाधारण रुग्णालयाचा ७६ वा वर्धापन दिन २४ तसेच २५ एप्रिल असे दोन दिवस साजरा करण्यात आला. या दोन दिवसांच्या कार्यक्रमात सन्मान सोहळे प्रबोधनात्मक संवाद आणि बरेच काही झाले असल्याचे प्रशासनाने सांगितले. २४ एप्रिलला रुग्णालयातील गुणी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी नायर, केईएम आणि कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता उपस्थित होते. तसेच संचालक डॉ. नीलम आंद्रादे यांच्यासह सेंट्रल पर्चेस विभागाचे सहआयुक्त उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुजाता पोळ व डॉ. अश्विनी सोनवे यांनी केले. दुपारी विद्यार्थ्यांनी ‘नाट्योदय’ हे दोन अंकी नाटक सादर केले. त्‍यानंतर दुपारी ‘रंगतरंग’ हा नृत्य गाण्यांचा कार्यक्रम सादर झाला. या कार्यक्रमास बॉलीवूडमधील ज्येष्ठ विनोदी अभिनेते जॉनी लिव्हर उपस्थित होते.