बीएडच्या सीईटीमध्ये विद्यार्थ्यांचे हाल

बीएडच्या सीईटीमध्ये विद्यार्थ्यांचे हाल

मुंबई, ता. २६ : खासगी कंत्राटदार कंपन्यांच्या भरवशावर राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या सीईटी या सामाईक प्रवेश घेणाऱ्या राज्य सीईटी कक्षाची अनागोंदी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. बी.एड प्रवेशाच्या सीईटीसाठी ऐनवेळी परीक्षा केंद्र बदलले तर काही विद्यार्थ्यांच्या हॉलतिकीटवर परीक्षेच्या तारखाच चुकीच्या टाकल्याने त्याचा फटका अनेक विद्यार्थ्यांना बसला आहे.
बी एड सीईटीसाठी नागपूर, नाशिक, बीड, लातूरातील परीक्षा केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला असून, त्यासाठी विद्यार्थी संघटनांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
बी.एड सीईटी परीक्षेचे कामकाज सीईटी सेलच्या माध्यमातून एडुस्पार्क इंट या खासगी कंपनीला देण्यात आले होते. मात्र या परीक्षेत परीक्षा केंद्र बदलणे, हॉलतिकीट आणि त्यावर चुका ठेवण्यात आल्याने त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. यावर सीईटी सेल ने केलेल्या खुलाशात या बी. एड सीईटीच्या परीक्षेत एकही विद्यार्थी वंचित राहिला नसल्याचे म्हटले आहे. तसेच २३, २४, २५ व २६ रोजी बी. एड सीईटी, बी प्लॉनिंग व एम. पी. एड सीईटी घेण्यात आली. मात्र २६ रोजी नाशिक, नागपूर, लातूर व अमरावती येथील केंद्र परीक्षेपूर्वी तीन दिवस आधी बदलल्यामुळे काही विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागले. परीक्षा केंद्रात ऐनवेळी केलेल्या बदलाबाबत खुलासा परीक्षा घेणाऱ्या तांत्रिक सेवा पुरवठादार कंपनीकडून मागविण्यात आला असून, त्यांच्‍याविरुध्द कार्यवाही प्रस्तावित करण्यात येत आहे. मात्र या प्रकारामुळे एकही विद्यार्थी परीक्षा देण्यापासून वंचित राहिलेला नाही, याची दक्षता सीईटी सेलने घेतली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com