अग्निशमन दलात ‘क्युआरव्ही’ वाहनांची भर!

अग्निशमन दलात ‘क्युआरव्ही’ वाहनांची भर!

‘क्विक रिस्पॉन्स व्हेईकल’साठी
शंभर कर्मचाऱ्यांची भरती
अग्निशमन दलातही कंत्राटीकरण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : मुंबई अग्निशमन दलामध्येही कंत्राटीकरण सुरू झाले असून क्विक रिस्पॉन्स व्हेईकल (क्यूआरव्ही) आणि त्यासाठी लागणारे कर्मचारी ठेकेदारी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठीची निविदा प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली आहे. साधारण १०० कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. पालिकेच्या प्रत्येक विभागातील क्यूआरव्ही वाहनांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी अग्निशमन दलामध्ये अत्याधुनिक क्यूआरव्ही वाहनांची संख्या वाढवण्यात येणार असून मे महिन्यापर्यंत २२ नवीन वाहने अग्निशमन दलाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.
मुंबई अग्निशमन दल अधिक सक्षम करण्याचे प्रयत्न पालिकेकडून सुरू आहेत. अग्निशमन दलाने प्रतिसाद वेळ कमी करून वेळेत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. अग्निशमन दलाने ज्या ठिकाणी तात्काळ वाहन पोहोचणे शक्य नसते किंवा वाहतूक कोंडीमुळे उशीर होतो, अशा ठिकाणी ‘मिनी फायर स्टेशन’ सुरू केले आहेत. त्याच धर्तीवर आता प्रत्येक विभागातील वाहनांची संख्या वाढवण्यावर भर देण्यात येत आहे. पालिकेच्या २४ पैकी २२ विभागांमध्ये नवी वाहने दिली जाणार आहेत. नवीन वाहनांचे वाटप उपनगरांमध्ये करून तेथील यंत्रणा अधिक सक्षम केली जाणार आहे.
मुंबई अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांनी जर्मनीत जाऊन तेथील तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेतली होती. त्यानंतर तशाच प्रकारची अत्याधुनिक वाहने अग्निशमन दलामध्ये घेण्याचा विचार सुरू झाला. त्यानुसार अग्निशमन दलामध्ये क्यूआरव्ही वाहने वाढण्यात येत आहेत.

१२० कोटी खर्च
अग्निशमन दलाने क्यूआरव्ही वाहने आणि त्यासाठी लागणारे कर्मचारी कंत्राटी पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. साधारण १०० कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. पालिका त्यासाठी सुमारे १२० कोटी रुपये खर्च करणार असल्याचे अग्निशमन दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com