बच्चू कडू यांना उच्च न्यायालयाचा दिलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बच्चू कडू यांना उच्च न्यायालयाचा दिलासा
बच्चू कडू यांना उच्च न्यायालयाचा दिलासा

बच्चू कडू यांना उच्च न्यायालयाचा दिलासा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २९ : सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या आरोपात शिक्षा सुनावलेल्या आमदार बच्चू कडू यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. नाशिक सत्र न्यायालयाने सुनावलेली शिक्षा न्यायालयाने स्थगित केली आहे.

अचलापूर मतदारसंघाचे आमदार असलेले कडू हे प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आहेत. २०१७ मध्ये नाशिक महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा यांना मारहाण आणि अपशब्द बोलल्याचा गुन्हा सरकारवाडा पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आला होता. दिव्यांग व्यक्तींसाठी राखीव असलेल्या आर्थिक निधीचा वापर केला जात नाही, या कारणांमुळे केलेल्या आंदोलनात कडू त्यावेळी सहभागी झाले होते. प्रहार अपंग क्रांतीच्या वतीने हे आंदोलन पुकारण्यात आले होते. यावेळी चर्चा करण्यासाठी कडू आणि अन्य सदस्य कृष्णा यांना भेटण्यासाठी गेले होते. मात्र तिथे बाचाबाची झाली आणि कडू यांनी मारहाण केली, असा आरोप करण्यात आला. नाशिक सत्र न्यायालयाने काही दिवसांपूर्वी त्यांना एक वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे. उच्च न्यायालयात कडू यांच्या याचिकेवर न्या. भारती डांग्रे यांच्या पुढे सुनावणी झाली. शिक्षेचा अवधी अल्प असल्यामुळे याचिका अंतिम सुनावणी होईपर्यंत शिक्षा निलंबित करत आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच कडू यांना पंचवीस हजार रुपयांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे.