व्हाईट ओक कॅपिटलचा मल्टी अॅसेट अॅलोकेशन फंड

व्हाईट ओक कॅपिटलचा मल्टी अॅसेट अॅलोकेशन फंड

मुंबई, ता. ३० : व्हाईट ओक कॅपिटल म्युच्युअल फंडातर्फे व्हाईट ओक कॅपिटल मल्टिअॅसेट अॅलोकेशन फंड बाजारात आणला असून तो ३ ते १० मेदरम्यान गुंतवणुकीसाठी खुला राहील. या ओपन एंडेड म्युच्युअल फंडामार्फत शेअर, कर्जरोखे, परदेशी कंपन्यांचे शेअर तसेच सोने-चांदीच्या गुंतवणुकीची साधने आदींमध्ये ठराविक प्रमाणात गुंतवणूक केली जाईल, अशी माहिती व्हाईट ओक कॅपिटल म्युच्युअल फंडाचे सीसीईओ आशीष सोमय्या यांनी दिली; तर या फंडामार्फत वेगवेगळ्या गुंतवणूक साधनांमध्ये गुंतवणूक केली जाणार असल्याने कोणत्याही एका मालमत्तेच्या भावात चढ-उतार आले तरी इतर मालमत्तांच्या साह्याने या फंडाची कामगिरी सरस राहील. त्यामुळे याच्या किमतीतील चढ-उतारही कमी होतील आणि दीर्घकालासाठी चांगली मूल्यवाढ मिळेल, अशी माहिती फंडाचे चीफ बिझनेस ऑफिसर प्रतीक पंत यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com