राज्यात कोरोना नियंत्रणात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यात कोरोना नियंत्रणात
राज्यात कोरोना नियंत्रणात

राज्यात कोरोना नियंत्रणात

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून रोज आढळणाऱ्या रुग्णसंख्येत घट झाली आहे. सोमवारी राज्यात १७७; तर मुंबईत ६१ नवीन रुग्णांची नोंद झाली. दरम्यान, राज्यात सोमवारी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सोमवारी १७७ नवीन रुग्ण आढळल्याने बाधित रुग्णांची संख्या ८१ लाख ६६ हजार ६८ वर पोहोचली आहे. दिवसभरात सोलापूर येथील एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने राज्यात मृतांची संख्या १ लाख ४८ हजार ५१५ वर पोहोचली आहे; तर दिवसभरात राज्यात २४९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने राज्यात आतापर्यंत ८० लाख १३ हजार ६२१ रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. त्यामुळे राज्यात सध्या ३,९३२ सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत दिवसभरात ६१ नवीन रुग्ण आढळल्याने बाधित रुग्णांची संख्या ११ लाख ६२ हजार ८७६ वर पोहोचली आहे; तर दिवसभरात शून्य मृत्यूची नोंद झाल्याने मृतांची संख्या १९ हजार ७६५ वर स्थिरावली आहे. दिवसभरात ५९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने मुंबईत आतापर्यंत ११ लाख ४२ हजार १८१ रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. त्यामुळे मुंबईत सध्या ९३० सक्रिय रुग्ण आहेत.