Wed, Sept 27, 2023

मुंबईत कोरोनाचे ४७ नवीन रुग्ण
मुंबईत कोरोनाचे ४७ नवीन रुग्ण
Published on : 2 May 2023, 4:26 am
मुंबई, ता. २ : मुंबईत मंगळवारी दिवसभरात कोरोनाचे ४७ नवीन रुग्णांची नोंद झाली. ९ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यातील ऑक्सिजन बेडवर चार रुग्ण आहेत. दरम्यान, मुंबईत दिवसभरात शून्य मृत्यूची नोंद झाल्याने मृतांची संख्या १९ हजार ७६५ वर पोहोचली आहे.
मंगळवारी दिवसभरात ४७ कोरोना रुग्णांची नोंद झाल्याने आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ११ लाख ६२ हजार ९२३ वर पोहोचली आहे. दिवसभरात १९१ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत ११ लाख ४२ हजार ३७२ रुग्ण कोरोनाला हरवले आहे. त्यामुळे मुंबईत सध्या एकूण ७८६ सक्रिय रुग्ण आहेत.