मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज कायम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज कायम
मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज कायम

मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज कायम

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : मुंबईवर पावसाचे सावट कायम असून पुढील ४८ तासांसाठी हलका किंवा मेघगर्जनेसह पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. उकाडा कमी झाला असून प्रदूषणाची पातळीही निवळल्याचे दिसले.
राज्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाची अवकृपा सुरू आहे. काही भागांत गारादेखील पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. मुंबईतदेखील अवकाळी पावसाचा इशारा गेल्या आठवडाभर हवामान खात्याकडून दिला जात आहे. काही तुरळक सरी वगळता मुंबईत जोरदार अवकाळी पाऊस इतक्यात झालेला नाही. हवामान खात्याने पुढील ४८ तासांत पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. पावसाच्या हलक्या सरी किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान ३४ तर किमान तापमान २६ अंश राहण्याची शक्यता आहे. तापमानात फारसा फरक जाणवणार नाही. आकाश ढगाळ राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
...........
हवा समाधानकारक
मुंबईत आज ५३ इतका समाधानकारक हवा गुणवत्ता निर्देशांक नोंदवला गेला. वरळी ४६, भांडुप ५०, माझगाव ४०, बोरिवली ५० सह उत्तम हवा गुणवत्ता निर्देशांकाची नोंद झाली. कुलाबा ७२, मालाड ७२, चेंबूर ९१, अंधेरी ५३ मध्ये समाधानकारक, तर बीकेसीमध्ये १३१ हवा गुणवत्ता निर्देशांक नोंदवण्यात आला.
.........
परिसर एक्यूआय स्तर
वरळी - ४६ उत्तम
भांडुप - ५० - उत्तम
माझगाव - ४० उत्तम
बोरिवली - ५० उत्तम
बीकेसी - १३१ मध्यम
कुलाबा - ७२ समाधानकारक
मालाड - ७२ समाधानकारक
चेंबूर - ९१ समाधानकारक
अंधेरी - ५३ समाधानकारक