राज्यात कोरोनामुळे चार बाधितांचा मृत्यू

राज्यात कोरोनामुळे चार बाधितांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : मुंबईसह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला, तरी मृत्यू होण्याच्या संख्येत चढउतार सुरू आहे. गुरुवारी राज्यात कोरोनामुळे चार बाधितांचा मृत्यू झाला; तर ३६१ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गुरुवारी राज्यात ३६१ नवीन रुग्ण आढळल्याने बाधित रुग्णांची संख्या ८१ लाख ६६ हजार ८६७ वर पोहचली आहे. दिवसभरात चार बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या १ लाख ४८ हजार ६३२ वर पोहचली आहे. दिवसभरात ७४९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने राज्यात आतापर्यंत ८० लाख १५ हजार ८६० रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. त्यामुळे राज्यात सध्या २,४७५ सक्रिय रुग्ण आहेत.
दरम्यान, मुंबईत ९६ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने बाधित रुग्णांची संख्या ११ लाख ६३ हजार ०८६ वर पोहचली आहे. दिवसभरात शून्य मृत्यूची नोंद झाल्याने मृतांची संख्या १९ हजार ७६६ वर स्थिरावली आहे. दिवसभरात १३५ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने मुंबईत आतापर्यंत ११ लाख ४२ हजार ६९१ रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. त्यामुळे मुंबईत सध्या ६२९ सक्रिय रुग्ण आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com