राज्य सरकारकडून रुग्णांना अर्थसाह्य

राज्य सरकारकडून रुग्णांना अर्थसाह्य

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने गेल्या १० महिन्यांत आठ हजार १९२ रुग्णांना एकूण ६० कोटी ४८ लाख रुपयांची मदत दिली आहे.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाकडून जुलै महिन्यात १९४ रुग्णांना ८३ लाखांची मदत देण्यात आली. नंतर ऑगस्ट महिन्यात २७६ रुग्णांना १ कोटी ४० लाख, सप्टेंबर महिन्यात ३३६ रुग्णांना १ कोटी ९३ लाख, ऑक्टोबर महिन्यात २५६ रुग्णांना २ कोटी २१ लाख, नोव्हेंबर महिन्यात ५२७ रुग्णांना ४ कोटी ५० लाख, डिसेंबर महिन्यात १०३१ रुग्णांना ८ कोटी ५२ लाख रुपयांची वैद्यकीय मदतीचा लाभ घेतला. २०२३ मध्ये जानेवारीत १०६० रुग्णांना ८ कोटी ८९ लाख, फेब्रुवारीमध्ये १२३७ रुग्णांना १० कोटी २७ लाख, मार्चमध्ये १४६९ रुग्णांना ११ कोटी ९५ लाख, तर एप्रिलमध्ये विक्रमी १९८४ रुग्णांना ९ कोटी ९३ लाख रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com