शाश्वत कापूस उत्पादनासाठी गोदरेज अॅग्रोव्हेटचा ‘पीवायएनए’ ब्रँड

शाश्वत कापूस उत्पादनासाठी गोदरेज अॅग्रोव्हेटचा ‘पीवायएनए’ ब्रँड

मुंबई, ता. ८ : गोदरेज अॅग्रोव्हेट लिमिटेडच्या क्रॉप प्रोटेक्शन विभागाने शाश्वत कापूस उत्पादनासाठी आज ‘पीवायएनए’ हा एकछत्री ब्रँड सादर केला. यात निवडक कापूस तणनाशकांसाठी पीवायएनए ब्रँडअंतर्गत हिटविड, हिटविड मॅक्स आणि मॅक्सकॉट अशी तीन कापूस तण व्यवस्थापन उत्पादने विक्री केली जाणार आहेत. पेरणी ते फुलांच्या टप्प्यापर्यंत पीवायएनए ब्रँड्स, कापसाच्या पिकातील तण कमी करतात आणि कापूस पीक सुरुवातीच्या टप्प्यात व्यवस्थित रुजण्यास मदत करतात. त्याचा उत्पादनावर थेट सकारात्मक परिणाम होतो व शेतकरी तणमुक्त पीक मिळवू शकतात. वापरण्यास सोपी आणि सुरक्षित, पीवायएनए ब्रँडची उत्पादने शेतकऱ्यांना तण नियंत्रणाच्या मानवी आणि यांत्रिक पद्धतींवरील अवलंबित्व कमी करण्यास मदत करतात, असे गोदरेज अॅग्रोव्हेटच्या क्रॉप प्रोटेक्शन बिझनेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजवेलू एन. के. म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com