ईडीच्या आरोपपत्रात अनिल परब याचे नाव नाही

ईडीच्या आरोपपत्रात अनिल परब याचे नाव नाही

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : दापोलीमधील साई रिसॉर्टप्रकरणी ईडीने विशेष न्यायालयात सोमवारी आरोपपत्र दाखल केले. आरोपपत्रात शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आमदार अनिल परब यांच्या नावाचा समावेश नाही, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

ईडीने सातत्याने साई रिसॉर्ट प्रकरणात परब यांच्याकडे चौकशी केली आहे. विशेष पीएमएलए न्यायालयात ईडीने चार हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपपत्रात व्यावसायिक सदानंद कदम, जयराम देशपांडे, सुधीर परदुले, विनोद दिपोलकर, सुरेश तुपे, अनंत कोळी इत्यादींच्या नावांचा उल्लेख करण्यात आला आहे. अनिल परब यांचा त्यात समावेश नाही. मात्र, परब यांच्या सांगण्यावरून व्यवहार झाल्याचा उल्लेख आहे. त्यात १३ साक्षीदारांसह २० जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.

साई रिसॉर्टची मालकी असलेले कदम आणि देशपांडे यांच्यावर ईडीने कारवाईही केली आहे. पर्यावरण नियमांचे उल्लंघन करून साई रिसॉर्ट बांधण्यात आले, असा दावा करण्यात आला आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने रिसॉर्टवर कारवाई केली आहे. परब यांना तूर्तास दिलासा मिळाला असला, तरी ईडीचा तपास सुरू आहे. अधिक तपासाबाबत पुरवणी आरोपपत्र ईडी दाखल करू शकते, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे यापुढेही परब यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


आरोपपत्रातील मुद्दे
विशेष पीएमएलए न्यायालयात ईडीने चार हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले. संबंधित प्रकरणात जयराम देशपांडे व सदानंद कदम यांना अटक झाली. दोघांसह सुधीर परदुले, विनोद दिपोलकर, सुरेश तुपे आणि अनंत कोळी यांच्या नावांचा आरोपपत्रात समावेश आहे. अनिल परब यांच्याविरोधात त्यात आरोप नाही. मात्र, त्यांच्या सहभागाचा आरोपपत्रात वारंवार उल्लेख आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com