Fri, Sept 22, 2023

मुंबईत कोरोनाचे ५६ नवीन रुग्ण
मुंबईत कोरोनाचे ५६ नवीन रुग्ण
Published on : 9 May 2023, 3:05 am
मुंबई, ता. ९ ः मुंबईत मंगळवारी कोरोनाच्या ५६ नवीन रुग्णांची नोंद झाली. चौघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ऑक्सिजन बेडवर एक रुग्ण आहे. दिवसभरात १,५१५ कोरोना चाचण्या करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
मुंबईत काही दिवसांपासून रोजच्या रुग्णांची संख्या शंभरच्या आत स्थिर राहिली आहे. मंगळवारी दिवसभरात ५६ कोरोना रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ११ लाख ६३ हजार ३५२ वर पोहोचली आहे. दिवसभरात ४७ रुग्णांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत ११ लाख ४३ हजार १५५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या एकूण ४२९ सक्रिय रुग्ण असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.