Fri, Sept 22, 2023

मुंबईत कोरोनाचे ४७ नवीन रुग्ण
मुंबईत कोरोनाचे ४७ नवीन रुग्ण
Published on : 10 May 2023, 2:53 am
मुंबईत कोरोनाचे ४७ नवीन रुग्ण
मुंबई, ता. १० : मुंबईत बुधवारी दिवसभरात कोरोनाच्या ४७ नवीन रुग्णांची नोंद झाली. चार रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील ऑक्सिजन बेडवर एकही रुग्ण नाही. दिवसभरात १,२७४ कोरोना चाचण्या करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून रोजची रुग्णांची संख्या शंभरच्या आत स्थिर राहिली आहे. बुधवारी दिवसभरात ४७ कोरोना रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ११ लाख ६३ हजार ३९९ वर पोहोचली आहे. दिवसभरात ६७ रुग्णांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत ११ लाख ४३ हजार २२२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या एकूण ४०९ सक्रिय रुग्ण असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.