व्हीएतजेटची भारतीयांसाठी दहा लाख स्वस्त तिकिटे

व्हीएतजेटची भारतीयांसाठी दहा लाख स्वस्त तिकिटे

मुंबई, ता. ११ ः व्हिएतनामची सर्वात मोठी खासगी विमान कंपनी व्हिएत जेटतर्फे भारतीयांसाठी साडेपाच हजार रुपये या सवलतीच्या दरात दहा लाख तिकिटे दिली जाणार आहेत. ही सवलत फक्त १७ मे पर्यंत लागू आहे.

व्हिएतनामला जाणाऱ्या सर्व मार्गावर भारतीयांना ही सवलतीच्या दरातील तिकिटे मिळतील. व्हिएत जेट एअरच्या वेबसाईटवर किंवा मोबाईल ॲपवर ही तिकिटे उपलब्ध असल्यास मिळतील. १० ऑगस्ट ते १२ डिसेंबर या कालावधीची तिकिटे बुक केल्यास ही सवलत मिळेल. व्हिएतनाममधील पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी ही सवलत जारी करण्यात आली आहे. १० मे ते १५ ऑगस्टदरम्यान तिकीट खरेदी करणाऱ्यांना एक लाख व्हिएतनामी डाँग एवढ्या मूल्याची व्हाउचर मिळतील. व्हिएतनाममधील पुढील तिकिटे काढताना ही व्हाउचर वापरता येतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com