सीबीएसईच्या परीक्षेचा निकाल जाहीर

सीबीएसईच्या परीक्षेचा निकाल जाहीर

मुंबई, ता. १२ : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावी, बारावी परीक्षेचा निकाल आज (ता. १२) जाहीर करण्यात आला. यात दहावीचा निकाल ९३.१२ टक्के, तर बारावीचा निकाल ८७.३३ टक्के इतका लागला आहे. या वेळी मंडळाकडून मागील अनेक वर्षांनंतर पाहिल्यांदा पहिल्या तीन विद्यार्थ्यांना पारितोषिक दिली जाणार आहेत; मात्र विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच विषयनिहाय सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता प्रमाणपत्र दिले जाणार असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले.

सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षेला देशभरातील १६ हजार ७२८ शाळांमधील १६ लाख ८० हजार २५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील १६ लाख ६० हजार ५११ विद्यार्थी परीक्षेस बसले. त्यामधील १४ लाख ५० हजार १७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल ६.०१ टक्क्यांनी अधिक आहे. मुलींचा निकाल ९०.६८ टक्के असून मुलांचा निकाल ८४.६७ टक्के एवढा लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या दहावी, बारावीचा निकाल घटला असून दहावीचा निकाल १.२८; तर बारावीचा निकाल ५.३८ टक्क्यांनी घसरला आहे. दहावीच्या परीक्षेला २१ लाख ८४ हजार ११७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यांपैकी २१ लाख ६५ हजार ८०५ विद्यार्थी परीक्षेला बसले. यातील २० लाख १६ हजार ७७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दहावीतही मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक असून ९४.२५ टक्के मुली; तर ९२.२७ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांचा निकाल ९० टक्के आहे.

--
पुणे विभाग पाचव्या स्थानावर
देशभरात दहावी, बारावीच्या परीक्षेत त्रिवेंद्रम विभागाचा सर्वाधिक निकाल लागला आहे. दहावीचा निकाल ९९.९१ टक्के; तर बारावीचा निकालही ९९.९१ टक्के इतका लागला आहे. दहावीच्या निकालात मुंबईचा समावेश असलेला पुणे विभाग पाचव्या स्थानावर आहे. पुणे विभागाचा निकाल ९६.९२ टक्के लागला आहे; तर पुणे विभागाचा बारावीचा निकाल ८७.२८ टक्के इतका लागला असून देशभरात पुणे विभाग आठव्या स्थानावर आहे.

सीबीएसई निकाल
बारावी देश राज्य
एकूण १४,५०,१७४ (८७.३३%) २८,३१७ (८७.११%)
----
दहावी देश राज्य
एकूण २०,१६,७७९ (९३.१२%) ९४,०८९(९६.९७%)
--
राज्यातील शाळांचा निकाल..
शाळा दहावी बारावी
सरकारी अनुदानित ९७.२३ ९७.२३
स्वतंत्र ९७.०९ ९७.०९
जे.एन.व्ही. ९९.९६ ९९.९६
केंद्रीय विद्यालय ९४.२६ ९४.२६
एकूण निकाल ९६.९७ ८७.३३

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com