नेहरू सेंटरमध्ये राबीन बार यांच्या चित्रांचे प्रदर्शन

नेहरू सेंटरमध्ये राबीन बार यांच्या चित्रांचे प्रदर्शन

मुंबई, ता. १५ : एकाच वेळी दोन हात आणि एका पायाने चित्र काढण्याचा जागतिक विक्रम करणारे जागतिक कीर्तीचे चित्रकार तथा ‘स्पीड पेंटर’ राबीन बार यांच्या नवनिर्मित चित्रांचे प्रदर्शन ‘हू एम आय’ या शीर्षकांतर्गत मुंबईत वरळी येथील प्रसिद्ध नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत सुरू झाले आहे. ते २२ मे पर्यंत चालणार आहे. राबीन बार यांच्या सर्जनशील कल्पनांची रचना करण्याच्या त्यांच्या कलागुणांवर आधारित ४५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. या कलावंताची खास ओळख म्हणजे ते दोन्ही हात आणि एका पायाने एकाच वेळी चित्रे काढतात. त्यांनी दोनदा जागतिक विक्रमही नोंदवला आहे. प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी दोन्ही हात आणि एका पायाने एकत्रितपणे त्यांनी तीन मिनिटांत ३० स्केचेस काढली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com